fire

रत्नागिरीतील लोटे MIDCमध्ये भीषण आग; Video आला समोर

1259 0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. नायट्रिक अ‍ॅसिड गॅस गळती झाल्यामुळे हि आग लागल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या गॅस गळतीचा अनेकांना त्रास झाला आहे. आरोमा इंटरमिजिएट्स असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. नायट्रिक अ‍ॅसिड गॅस लिकेज झाल्यामुळे या कंपनीला हि आग लागली आहे.

काय घडले नेमके?
आरोमा इंटरमिजिएट्स या कंपनीमध्ये नायट्रिक गॅस गळती होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गुणदे तलारीवाडी येथील पाच ते सहा ग्रामस्थांना गॅस गळतीमुळे किरकोळ त्रास झाला आहे. यामुळे कंपनीचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

हि आग एवढी भीषण होती कि दोन किलोमीटर लांबून या आगीच्या धुराचे लोट दिसत होते. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशामक दलाच्या शर्तीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवत हि आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Share This News
error: Content is protected !!