महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी लढत होणार आहे.विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
राजन साळवी यांना नुकतंच शिवसेनेचं उपनेतेपद दिलेलं आहे. या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राजन साळवी यांचा अर्ज भरण्यावेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू हे उपस्थित होते.विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यातआलं आहे.