Raigad-Mahad MIDC Blast

Raigad-Mahad MIDC Blast : रायगड-महाड MIDC कंपनीत मोठा स्फोट; 4 जणांचा मृत्यू

845 0

रायगड : रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये रायगड-महाड एमआयडीसी (Raigad-Mahad MIDC Blast) येथे मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता कि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रायगड-महाड येथील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये हा स्फोट झाला आहे.

काय घडले नेमके?
रायगड-महाड येथील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे आजुबाजूचा परिसर हादरला.स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली. यामुळे कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. या भीषण दुर्घटनेत एका कामगाराला गॅसची लागण तर काही कामगार अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 11 कामगार अद्याप बेपत्ता असल्याचेदेखील समोर आले आहे.

बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. आग नियंत्रणात असली तरी जिल्ह्यातील अनेक अग्निशमन यंत्रणा, पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटानंतर प्लांट मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. अग्निशमन वाहनांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Share This News
error: Content is protected !!