Murud-Janjira-Fort

जंजिरा किल्ला आजपासून 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद

3589 0

मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्‍ला (Janjira Fort) आजपासून पुढील तीन महिने पर्यटकांसह (Tourists) स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अवघ्‍या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्‍याने, समुद्राच्या पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे. त्‍यामुळे शिडाच्या बोटी (Sailboats) भरकटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून सलग तीन महिने पुरातत्त्व खात्याच्या आदेशानुसार, जंजिरा किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंधित केला आहे. त्यामुळे शिडाच्या बोटीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामगारांना तीन महिने रोजगारापासून (Employment) मुकावे लागणार आहे तसेच राजपुरी बंदरातील (Rajpuri Port) स्टॉलधारक तसेच उपहारगृहांनाही 1 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!