नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी आणि महागडी मद्य कंपनी डियाजिओचे (Diageo) भारतीय वंशाचे सीईओ इवान मैनुअल मेनेजेस (Ivan Manuel Menezes) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन (Pass Away) झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. विशेष म्हणजे ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्ती घेणार होते. मेनेजेस यांना पोटाचा अल्सर (Stomach Ulcer) असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोण आहेत इवान मेनेजेस ?
पुण्यात (Pune) जन्मलेले मेनेजेस, ज्यांचे वडील मैनुअल मेनेजेस भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते, त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेज आणि IMM, अहमदाबाद येथे शिक्षण घेतले.1997 मध्ये ते डिएजिओमध्ये सामील झाले. ते जुलै 2012 मध्ये कार्यकारी संचालक आणि जुलै 2013 मध्ये सीईओ बनले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नाइट ही पदवी देण्यात आली.
इव्हान मॅनेजेस हे स्कॉच व्हिस्की असोसिएशन कौन्सिलचे अध्यक्ष देखील होते. तसेच ते टेपेस्ट्रीचे कार्यकारी संचालक, केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य, मूव्हमेंट टू वर्कचे विश्वस्त आणि आंतरराष्ट्रीय अलायन्स फॉर रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंगचे सदस्य देखील होते. इवान मेनेजेस यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी डेब्रा क्रू यांच्याकडे सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.