Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

715 0

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली. तसेच त्यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते असे आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला का गेले यावरून वाद आहे. पण संभाजीराजे संगमेश्वरला गेल्याची माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोहचली? तर जयचंदमुळे गेले असा इतिहास आहे. तसेच संभाजीराजेंना जो दंड औरंगजेबाने दिला त्याची आम्ही निंदा करतो. संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी पोचवली. संभाजीराजेंची हत्या, मुस्लिम धर्माशी सहमत नाही असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

KCR : उद्या एकादशी अन् आज केसीआरच्या ताफ्याला धाराशिवात बोकडाच्या मटणाची पार्टी

छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली होती. आपण जेवढा निषेध औरंगजेबचा करतो तेवढाच शिर्के,आबा भटजी यांचाही करायला पाहिजे. हे वस्तुस्थितीला धरून नाही.देशात जो हिंदू-मुस्लिम, जैन-हिंदू हा वाद होतोय त्याबाबत जो इतिहास सांगितला जात आहे. तो बरोबर नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येत हिंदू सहभागी होते असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.औरंगजेब कबरीवर अनेकजण गेले आहेत. मी औरंगजेबाच्या कबरीवर फुल चढवली, माझ्या त्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली.असेही प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्पष्ट केलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!