Pradeep Sharma

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जामीन मंंजूर

510 0

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) सुप्रीम कोर्टाने अँटालिया स्फोटक प्रकरणात जामीन (Pradeep Sharma) मंजूर केला आहे. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसूख हिरेन खून प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निकाल राखून ठेवला होता. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मांना जामीन नाकारल्यावर शर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

काय आहे नेमके प्रकरण?
25 फेब्रुवारी 2021 या दिवशी उद्योगपती मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अँटालिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या घटनेनंतर स्कॉर्पिओ मालक मनसूख हिरेन याचा मृतदेह ठाण्याजवळ खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. यानंतर NIA ने याप्रकरणी तत्कालीन एपीआय सचिन वाझेला अटक केली होती. यानंतर या प्रकरणी प्रदीप शर्मांसह 9 जणांना एनआयएने अटक केली. प्रदीप शर्मांवर वाझेला या प्रकरणातील पुरावे मिटवायला मदत केली असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!