Drugs Raid

Drugs Raid : सोलापूरमध्ये ड्रग्सच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

1250 0

सोलापूर : सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर आता सोलापूरमध्ये पोलिसांनी ड्रग्ससाठा (Drugs Raid) जप्त केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पथकानं सोलापुरात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. आता सोलापूरमध्ये ड्रग्स साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर छापा टाकला. पोलिसांकडून या छाप्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चामाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांच्या तीन पथकानं सोलापुरमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे.

यापूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पोलिसांनी छापेमारी केली होती. या दोन्ही शहरातून मोठ्याप्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. या ड्रग्सप्रकरणी आता पोलीस अजून कोणत्या जिल्ह्यात छापेमारी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!