Devendra Fadanvis

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ प्रकरणाची दखल घेत गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

397 0

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) एक धक्कादायक प्रकार घडला होता. यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर (FIR) नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.

या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी कमिटी फक्त यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करणार आहे. मागच्या वर्षीदेखील एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

Share This News
error: Content is protected !!