Ravikant Tupkar

Onion Export Tax : कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्या,अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील घरात कांदा फेकणार : रविकांत तुपकरांचा इशारा

796 0

बुलढाणा : केंद्र सरकारने कांद्यावर 40 % निर्यात कर (Onion Export Tax) लादून आणखी एक शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. ज्यावेळी सोयाबीन-कापसाचे भाव पडले त्यावेळी केंद्र सरकारने भाव (Onion Export Tax) वाढविण्यासाठी हस्तक्षेप केला नाही, मात्र आता टोमॅटो,कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडत आहे, असे दिसताच अनेकांच्या पोटात दुखायला लागले. केंद्र सरकारनेही लगेच भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविण्यास सुरवात केली. विशिष्ट मतदारवर्ग टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकर्‍यांना मारण्याचे धोरण राबविले जात आहे.

कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही, कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरणार नाही, त्यामुळे जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडणार असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याच कारण काय..?

केंद्र सरकारच्या या धोरणांचा निषेध करत केंद्र सरकारने तातडीने 40% निर्यात शुल्कचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कांदा फेकू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!