मुंबई : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता (Neelam Gorhe) आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Ramesh Wanjale’s Family : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांचा अजित पवारांना पाठिंबा
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीतीनुसार पुण्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज विधान परिषद आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आज हा पक्षप्रवेश होणार आहे. जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जाईल.