राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; मलीकांना डच्चू तर आव्हाडांचं ‘प्रमोशन’

685 0

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड  आणि नरेंद्र वर्मा  यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार , माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे  यांची निवड झाली आहे.

माजी मंत्री नवाब मलिक यांना मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीतून डावलण्यात आलं आहे.

*अशी आहे राष्ट्रवादीची कार्यकारिणी*

  • राष्ट्रीय अध्यक्ष – शरद पवार
  • राष्ट्रीय उपाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल
  • राष्ट्रीय सरचिटणीस – सुनील तटकरे
  • राष्ट्रीय सरचिटणीस – योगानंद शास्त्री
  • राष्ट्रीय सरचिटणीस – के के शर्मा
  • राष्ट्रीय सरचिटणीस – पीपी मोहम्मद फैजल
  • राष्ट्रीय सरचिटणीस – नरेंद्र वर्मा
  • राष्ट्रीय सरचिटणीस – जितेंद्र आव्हाड
  • राष्ट्रीय खजिनदार – वाय पी त्रिवेदी
  • कायम सचिव – एस आर कोहली
Share This News
error: Content is protected !!