Narhari Zhirval

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स (Video)

379 0

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) हे स्पष्टवक्तेपणा आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात. त्यांनी काही दिवसांपूर्वी परदेश दौरा केला तेव्हा त्यांच्या मराठमोळ्या पेहरावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या नरहरी झिरवळ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांचा पत्नीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.

नरहरी झिरवाळ यांनी एका लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन संभळ या पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

कोण आहेत नरहरी झिरवाळ ?
नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा (Dindori Assembly) मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यात वनारे हे त्यांचे गाव असून ते आदिवासी बहुल भागात आहे.गेल्या महिन्यात नरहरी झिरवळ हे पत्नीसह जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी लुगडं, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून होत्या. त्यांच्या या साधेपणाचे खूप कौतुक झाले होते.

Share This News
error: Content is protected !!