Megha Pawar

शेतकऱ्याच्या मुलीची नेत्रदिपक कामगिरी! ए.फार्मा परीक्षेत मिळवले सुवर्णपदक

358 0

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील मेघा पवार या विद्यार्थिनीने एम फार्मच्या परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवून नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे.मेघा पवार हिने परिस्थितीशी दोन हात करत हे यश संपादन केले आहे.

मेघा पवार हिनं सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मुबारकपूर येथील जिल्हा परिषद शाळेत घेतलं. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेतलं. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम फार्मच्या परीक्षेत तिनं सुवर्णपदक मिळवलं आहे. मेघा पवार हिनं औषधनिर्माण शास्त्र अर्थात फार्मसीच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवत इतर मुलींपुढं आदर्श निर्माण केला आहे.

मेघा पवार हिच्या कुटुंबात आई-वडील, चार बहिणी आणि दोन भाऊ असं कुटुंब आहे. मेघा पवार हिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. मेघा पवार हिनं बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर शिरपूरच्या आरसी पटेल फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यानंतर तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मास्टर ऑफ फार्मसीच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळवले. मेघा पवार घरच्यांना कामात मदत करुन रात्री अभ्यास करत असे. तिनं या यशाचं श्रेय आई वडिलांना आणि शिक्षकांना दिलं आहे. मी एम फार्मसी केल्यानंतर गावातील इतर विद्यार्थिनी देखील शिक्षणाकडे वळू लागल्याचं मेघा पवार हिने सांगितले आहे. मेघाचं यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.

Share This News
error: Content is protected !!