Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : पुरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांकडे पुरग्रस्तांनी केली ‘ही’ मागणी

1374 0

नागपूर : उपमुख्यमंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून च्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. दागा लेआऊटमध्ये देखील फडणवीसांनी नुकसानाचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. पाहणी करुन पुढे जात असतानाच पुरग्रस्तांनी उपमुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली.

पुरग्रस्तांनी काय केली मागणी?
नागपुरातील डागा ले आउट भागात पुरामुळे 10 हजार घरांचं नुकसान झालं आहे. ढगफुटीसारख्या पावसानं नागपुरातील अनेक भागात पुराचं पाणी शिरलं.. शेकडो संसार उघड्यावर आलेत.. पुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ आश्वासन
नागपुरातील कॉर्पोरेशन कॉलनीतील अनेक घरं पाण्याखाली गेली होती.. या भागातील गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. सर्व पुरग्रस्तांना मदत मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तातडीची दहा हजारांची मदत तर दुकानांना 50 हजार आणि टपरीधारकांना दहा हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नागपुरात कुठे किती पाऊस?
नागपूर विमानतळ परिसरामध्ये 111 मिमी पावसाची नोंद झाली, तर सीतीबर्डी परिसरामध्ये देखील 111 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पार्डी भागामध्ये 103 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच वाडी परिसरामध्ये सर्वाधिक 229 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!