Mumbai Pune Highway

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

2173 0

पुणे: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai -Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर कॉरिडॉरचे काम केले जाणार आहे त्यामुळे हा मेघा ब्लॉक घेतला जाणार आहे. कामाच्या वेळेत मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे. हलक्या व अवजड वाहनांना या वेळेत हायवेवर प्रवेश दिला जाणार नाही.

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी 7.560 (चिखले ब्रिज) येथे दिनांक 18/01/2024 रोजी 11  ते 5  च्या दरम्यान करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या वरील नियोजित कामाचे वेळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग
1. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. 55 वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र 48 या मार्गावरून मार्गस्त करता येतील.

2. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने व बसेस मुंबई लेन कि.मी. 39.800 खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्त करता येतील.

3. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोल नाका शेवटच्या लेन ने खालापूर एक्झिट कि.मी. 32.500 येथून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्त करता येतील.

4. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने मुंबई लेन कि.मी. 9.600पनवेल एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील.

5. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune News : पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांच्यावर स्टेशन परिसरात हल्ला

Narendra Modi : पंतप्रधान मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!