Mumbai Police

Mumbai Police : दसऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी नागरिकांना ‘हा’ खास संदेश देत दिल्या शुभेच्छा

688 0

मुंबई : आज राज्यात सगळीकडे उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त (Mumbai Police) घरोघरी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून दारावर लावण्यात येते. तसेच पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र काढून, घरातील स्त्रिया सोने, लहान मुले, तरुण मंडळी वह्या-पुस्तके, नोकरी करणारे त्यांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा घरातील अवजारे आदी सर्व मांडून त्यांच्याकडून पूजा केली जातात आणि आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. या सणाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनीसुद्धा दोन पोस्ट शेअर करून, दसऱ्याच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आपण पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे चित्र रेखाटतो, त्याप्रमाणे चित्र रेखाटले आहे. तसेच विशेष म्हणजे सरस्वती काढल्यानंतर 15 त्रिकोण दिसत आहेत. त्या प्रत्येक त्रिकोणात एक-एक वाहतुकीचे चिन्ह चित्रित केले आहे.या चिन्हांमध्ये शाळा/विद्यालय, अरुंद रस्ता, पादचारी ओलांडणे, अरुंद पूल, असमान रस्ता, ट्रॅफिक सिग्नल किंवा वाहतूक संकेत, रस्त्याचे काम सुरू, उजवीकडे वळा, काटकोनी जोडरस्ता, निसरडा रस्ता, डावीकडे यू टर्न, धोकादायक खोल रस्ता, उभा चढ आदी चिन्हांचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत @mumbaipolice या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या पोस्ट शेअर केल्या आहेत.वाहतूक चिन्हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रवास करताना या चिन्हांचे महत्त्व आणि वाहतुकीचे नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी या गोष्टीची मुंबई पोलिस त्यांच्या हटके पद्धतीने प्रवासी आणि नागरिकांना आठवण करून देत असतात. आज त्यांनी दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने अशा अनोख्या आणि खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!