Mumbai Crime News: मुंबईतील दहावीचा विद्यार्थी मित्रा सोबत हॉल तिकीट आणायला गेला ,आणि दुर्दैवाने अपघातात जीव गमावला.
मुंबई पोलीस . Mumbai road accident news| मित्रा सोबत दहावी परीक्षा हॉल तिकीटचे प्रिंट आऊट आणायला गेलेला असताना, डंपरने दिलेल्या धडकेमध्ये विद्यार्थ्याने गमावला जीव. अपघातात जीव गमावलेल्या विद्यार्थ्याचे नाव दीपांशू बौद्ध (वय १५)(Deepanshu baudh) आहे. तुर्भे एमआयडीसी तील इंदिरानगर मध्ये हा विद्यार्थी राहत होता.
ही घटना तुर्भे नाका येथे घडली अपघातानंतर डंपर चालक तिथून प्रसार झाला आहे. दीपांशू बौद्ध या विद्यार्थ्यांची आज शुक्रवारपासून दहावी बोर्ड परीक्षा चालू होणार होती. दीपांशू इंदिरानगर येथून सायकल वर तुर्भे नाका येथे हॉल तिकीट चे प्रिंट आऊट कढायला जात होता .त्याचा मित्र अल्ताफ हा देखील त्याच्यासोबत होता. फायजर रोड वरून जात असताना आमित पॅलेस बार समोर ते दोघे थांबले होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिली.
दीपांशू यात गंभीर जखमी झाला , व त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. फरार झालेल्या चालकाला तुर्भे एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.डंपर चालका विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.