छावा चित्रपट लवकरच मराठीत प्रदर्शित होणार

छावा चित्रपट लवकरच मराठीत प्रदर्शित होणार

1508 0

Chhava Movie Released Marathi: ‘छावा’ चित्रपट लवकरच मराठीत प्रदर्शित होणार; मंत्री उदय
सामंत यांची माहिती.

छत्रपती संभाजी महाराजांच्या(Chh.Sambhaji Maharaj) जिवनचरीत्रावर आधारित ‘छावा’ चित्रपट (Chhaava Movie) प्रदर्शित होण्या आधी पासून व झाल्या नंतर सुध्दा सर्व जग भर गाजला आहे. हा‌ चित्रपट 14 फेब्रुवारी या दिवशी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी 33.1 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल(Vicky Kushal), रश्मिका मंदाना(Rashmika Mandana), अक्षय खन्ना(Akshaye Khanna) या उत्कृष्ट कलाकारांनी त्यांच्या भूमिका अतिशय बखुबीने निभावल्या आहेत. व या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती भेटत आहे. लक्ष्मण उतेकर(Laxuman Utekar) यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाअंतर्गत हा सिनेमा सगळ्या कसोट्यांवर खरा उतरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अख्खं जंग भर पोहचली आहे.

छावा चित्रपट हिंदी मध्ये दिग्दर्शित होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच आता मराठी भाषा मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी या चित्रपटाची मराठी भाषेमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी लक्ष्मण उतेकर यांना केली होती आणि लक्ष्मण उतेकर(Laxuman Utekar) यांनी त्याला सकारात्मक प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे तर आता छावा चित्रपट मराठी भाषेमध्ये सुद्धा प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.बहुदा मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट येत्या काही वर्षांत मराठी भाषेमध्ये पाहण्याची संधी मिळू शकते.

छावा चित्रपटांमध्ये विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे .रश्मिका मंदाना यांनी राणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. या दोघांनी संभाजी महाराज येसूबाई यांच्यातील सुसंवाद, नातं अतिशय सुंदर पणे रुपेरी पडद्यावरती रेखाटली आहे. तसेच हिंदी सिनेमा मधील इतर अनेक उत्कृष्ट कलाकारांच्या सोबतीने हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट रित्या रुपेरी पडद्यावरती मांडण्यात आला आहे. यामुळे या चित्रपटात इतर चित्रपटांपेक्षा जास्तीत जास्त मागणी किंवा पसंती मिळत आहे. हिंदी मध्ये तर छावा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण मराठी भाषेमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतो ते पहावे लागल.

तसेच छावा चित्रपटाचे मराठी भाषेतील भाषांतर कोणाच्या आवाजामध्ये करण्यात येणार आहे व कोणत्या भूमिकेसाठी मराठीतील कोणत्या कलाकारांचा आवाज देण्यात येणार आहे. याची उत्सुकता मराठी प्रेक्षकांना असेलच. सिने सृष्टीच्या इतिहासातील पहिलाच असा चित्रपट आहे जो मराठी, हिंदी भाषेत तसेच इतर देशांतही अतिशय आवडीने पाहिला जातो आहे. जय भवानी ,जय शिवराय!

Share This News
error: Content is protected !!