amol kolhe

Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? काल अजित पवारांसोबत असलेले अमोल कोल्हे आज म्हणतात…

723 0

मुंबई : अजित पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.अजित पवारांनी शुक्रवारी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. या संपूर्ण घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यामुळे काल अजित दादांना पाठींबा देणारे ,आज शरद पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले जात आहेत.

Poster : राज आणि उद्धव एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

काल खासदार अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांना पाठींबा दिला होता.त्यानंतर अमोल कोल्हे यांनी यासंबधी एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत , त्यांनी दोन ओळी लिहिल्या आहेत. त्यात अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले आहे. यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्यात अमोल कोल्हेनी सांगितलं आहे,की ते शरद पवारांना भेटून त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व आमदारांना 5 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याच दिवशी दोन बैठकीचेही नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने बंडखोर आमदार , खासदारांना अल्टिमेटम दिल्यामुळे नेते आपली भूमिका स्पष्ट करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Share This News
error: Content is protected !!