Monsoon News

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

1175 0

मुंबई : मान्सून भारतात दाखल झाला आहे. मान्सूनचं (Monsoon Update) केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे.10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि तो पुढे हळूहळू ईशान्य भारताच्या बहुतांश भागांत पुढे सरकेल, असं सांगितलं जात आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News
error: Content is protected !!