Breaking News
MNS Worker

MNS Worker : अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड

914 0

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याच्या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Worker) संबंधित टोलनाक्याची तोडफोड केली आहे. अमित ठाकरे यांना अर्धा तास ताटकळत ठेवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांकडून (MNS Worker) ही तोडफोड करण्यात आली आहे.

थरारक पाठलाग करत तरुणाला भर रस्त्यात संपवले, नाशिकमधील घटना

काय घडले नेमके?
अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

मध्यरात्री नाशिक शहराचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी (MNS Worker) टोलनाक्याची तोडफोड केली आहे. ही संपूर्ण तोडफोडीची घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!