Shahaji Bapu Patil

मराठा आंदोलकांनी गाडी अडवताच आ. शहाजी बापू म्हणाले ‘मी तुमच्या पाय पडतो’

692 0

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे. या आंदोलनादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.यादरम्यान सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा ताफा मराठा आंदोलकांकडून अडवण्यात आला.

काय घडले नेमके?
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे पंढरपूर येथील नवीन कराड नाका येथे आले असता मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून नेत्यांना गावबंदी असताना तुम्ही कसे आलात याचा जाब विचारला? आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ड्रायव्हरने मराठा आंदोलकांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला नंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी गाडीतून खाली उतरून मराठा आंदोलकांची माफी मागितली.

यादरम्यान मराठा आंदोलक तरुणांनी एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा दिल्या. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि शहाजी बापू आपली कार घेऊन माघारी परतले.

Share This News
error: Content is protected !!