Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील नागणेंचा आत्मदहनाचा प्रयत्न

408 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणा संबंधित (Maratha Reservation) आपले उपोषण मागे घेतले. मात्र तरीदेखील मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही धगधगता आहे. यादरम्यान आता मराठा वनवास यात्रेचे सुनील लागणे यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ध्वजारोहण सुरू असतानाच त्यांच्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर सुनील नागणे आणि प्रताप कांचन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण पार पडत असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा वनवासी यात्रेचे संयोजक सुनील नागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारच्या निषेधाच्या ही घोषणा दिल्या.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे यासाठी आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत आसताना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी नागणे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करून नागणे यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

Share This News
error: Content is protected !!