सोलापूर : सोलापुरमध्ये मराठा समाज (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सोलापुरातल्या एका गावात मराठा समाजाने भाजपा आणि मित्र पक्षाला मतदान न करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे. ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवत ही शपथ घेतली आहे. सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नसून , मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. तसेच यापुढे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी शपथ गावातल्या मराठा समाजाने घेतली आहे.
कुठे घडला हा प्रकार?
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी ग्रामस्थ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या वतीने भाजप आणि देवेंद्र फडणीवीसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी सामूहिक शपथ घेण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली आहे. भाजप, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मित्रपक्षाला आम्ही सहकार्य करणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही उमेदवाराने कोंडी गावामध्ये पाऊल ठेवताना दहावेळा विचार केला पाहिजे, असा इशारा कोंडी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी नेमकी काय घेतली शपथ?
” जो पर्यंत मराठा समाजाला आतून विरोध करणारे, मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तो पर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही,” अशी शपथ मराठा समाजाच्या लोकांनी घेतली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात