Breaking News
Ajit Pawar

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश; अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

480 0

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, यावेळी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वहस्ते जरांगेंना ज्यूस पाजवून उपोषण सोडवून जरांगेंवर विजयाचा गुलाल उधळला. तर यावेळी कृतज्ञतेपोटी मराठा बांधवांनी मुख्यमंत्री शिंदेंना चांदीची तलवार भेट दिली. मराठा आरक्षण घेणार आणि मुंबईत विजयी गुलाल उधळणार, असं जरांगे म्हणाले होते. मात्र मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार?
मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जनांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली, त्याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. महायुतीचं सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत आहे, आगामी काळात देखील असेच निर्णय घेत राहू, असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

Accident Video : चालकाची एक चूक अन् 7 जण ठार; थरकाप उडवणारा अपघात आला समोर

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Share This News
error: Content is protected !!