Maratha Reservation

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

1063 0

यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी बीडच्या माझलगाव येथे प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ केल्यानंतर आता यवतमाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर रस्ते मार्गाने कार्यक्रमस्थळी येत होते. यावेळी काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कार्यक्रमामध्येच गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतलं आहे.

Share This News
error: Content is protected !!