Maratha Reservation

Maratha Reservation : बुलढाण्यात आंदोलक आक्रमक; तरुणाचा इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न

324 0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात राज्यातील पहिला मराठा क्रांती मोर्चा (Maratha Reservation) आयोजित करण्यात आला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं (Maratha Reservation) या मागणीसाठी आणि जालन्यात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा ची हाक देण्यात आली. या मोर्चाला सुरुवात होताच एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच आत्महत्या करणाऱ्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. संभाजी भाकरे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सात वर्षांपूर्वी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा नंतर पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाची हाक बुलढाण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा म्हणत एकत्र आले आहेत. यावेळी एका तरुणाने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी उडी मारणाऱ्याला वेळीच पकडले. आणि मोठा अनर्थ टळला.

बुलढाणा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत मराठ्यांना स्वतंत्र असं आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. या मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व मागील मराठा क्रांती मोर्चा प्रमाणेच मराठा युवतींनी केले आहे. मराठा युवतींच्या एका शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!