Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

3588 0

धाराशिव : सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा आरक्षणासाठी दौरा सुरु आहे. यादरम्यान त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. सभा संपताच मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी तपासलं. शुगर कमी झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. शुगर 76 वर पोहोचल्याने डॉक्टरांनी मनोज जरांगे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील पाच दिवस मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे, मराठा समाजाला सरसकट आरक्षण ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक खालावली, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सभा संपताच डॉक्टरांकडून त्यांचं चेकअप करण्यात आलं.

तब्येत खालवल्यानं जरांगे पाटील यांना प्रतिक्रिया देणं देखील शक्य झालं नाही. ते दोन व्यक्तींचा आधार घेऊन गाडीत बसले. सलग उपोषण व प्रवास सुरू असल्याने जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांनी आता पुढील पाच दिवस आराम करावा असा सल्ला त्यांच्या डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!