Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाई गडबड नको नि. न्यायमूर्तींचं जरांगेंना आवाहन

1545 0

जालना: आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेच्या भेटीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरावली सराटी या ठिकाणी गेले आहेत. नि. न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे, आणि नि. न्यायमूर्ती एम जी गायकवाड, माजी अध्यक्ष, राज्य मागासवर्ग आयोग यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.

नि. न्यायमूर्ती आणि मनोज जरांगेंमध्ये नेमकी काय चर्चा?
मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल, पण घाईगडबडीत निर्णय होऊ नये. घाईत घेतलेले निर्णय कोर्टात टिकत नाहीत. कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावे लागतील. एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नाही. असं निवृत्ती न्यायमूर्तींनी मनोज जरांगेंना सांगितलं. कायदेशीर बाबी आणि यापूर्वी राहिलेल्या कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील. त्या दूर केल्या जात आहेत. त्यासाठी थोडा वेळ लागेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणखी थोडा वेळ द्या, नक्की आरक्षण मिळेल असे नि. न्यायमूर्ती म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ जालन्यात आलं. त्यामध्ये दोन निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. एक दोन दिवसात हा निर्णय होणार नाही, त्यासाठी काही वेळ देण्याची मागणी त्यांनी केली. असं घाई गडबडीत दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही असंही त्यांनी जरांगे यांना समजावून सांगितलं. आपल्याला अपेक्षित आरक्षण नक्की मिळेल, पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल अशी विनंती या समितीकडून जरांगेंना करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!