Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; सुनील प्रभूंकडून कोर्टात याचिका दाखल

538 0

मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे रविवारी राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप झाला. त्यातच आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट सक्रिय (Maharashtra Politics) झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सुनील प्रभू यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून निलंबनाच्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाला निर्देश द्यावेत. अशी मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा यु- टर्न; काल शरद पवारांना पाठिंबा आणि आज अजित पवारांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांच्या निलंबनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी आता प्रभू यांनी कोर्टात केली आहे. यासोबतच,विधानसभा अध्यक्षांना तात्काळ निलंबनाबाबतच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे . सुनील प्रभू यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sangli News : सांगलीतल्या शेतकऱ्याचं पवार प्रेम; चक्क बैलाच्या अंगावर रेखाटली साहेबांची कलाकृती

शिवसेने प्रमाणेच फोडण्यात आली राष्ट्रवादी
दरम्यान, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे शिवसेना फोडण्यात (Maharashtra Politics) आली होती; अगदी त्याच प्रमाणे राष्ट्रवादीलाही आता मोठे खिंडार पाडण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बंडाची पद्धत सारखीच आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता,अगदी त्याच प्रमाणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे.

Share This News
error: Content is protected !!