Raj Thackeray

Raj Thackeray : घडाळ्यानं काटा काढला कि काट्यानं घड्याळ? राज ठाकरेंची टीका

792 0

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit Pawar) 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट पडले आहेत.पक्षामध्ये ही उभी फूट पडल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

या सगळ्या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!