‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ राज ठाकरेंनी अशी कुणावर केली टीका

335 0

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत भोंग्यांसंदर्भातील विषय छेडला. जर मशिदींवर भोंगे लावले तर मशिदिंसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावू, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राणा दाम्पत्याला या सगळ्या प्रकरणात जेल मध्ये जावं लागलं होतं. पुण्यातील राज ठाकरेंनी जाहीर सभेत राणा दाम्पत्याला टोला लगावला.

‘राणा दाम्पत्य मातोश्री वर हनुमान चालुसाचे पठण करण्यास का गेले? ‘मातोश्री’ काय मशीद आहे का? त्यांच्या या हट्टामुळे त्यांना जेल मध्ये जावं लागलं, मग झालं मधू इथे अन् चंद्र तिथे. शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आणि राणा दाम्पत्याने सुद्धा शिवसेनेवर टीका टिपण्णी केली. एवढं होऊनही लडाख मध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत,’ अशी टीका राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!