Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये उसळली गर्दी; Video आला समोर

925 0

मुंबई : ‘लालबागचा राजा’ हा (Lalbaugcha Raja) कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. लालबागच्या राजाकडे सर्व मनोकामना पूर्ण होतात, मनातील इच्छापूर्ती होते. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविक विश्वासाने येत असतात.

https://www.facebook.com/100049769976674/videos/991011182334250/?mibextid=2Rb1fB

या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या कलाकार, मंत्री, हे सगळेजण आवर्जून लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात. मात्र सध्या याच लालबागच्या मंडपामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आलेल्या भाविकांची गर्दी उसळल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!