Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापुरात हिजाबवरून पेटला वाद; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जय श्री रामच्या घोषणा देत आंदोलन

590 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील (Kolhapur News) विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून मोठा वाद झाला झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी भगवा गमजा घालून वर्गात बसल्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. जो विद्यार्थी भगवा गमजा घालून बसला होता त्याला शिक्षकांनी वर्गातून बाहेर काढल्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

Kolhapur News : रस्त्याने जात असताना अचानक गाढवाचा वृद्ध व्यक्तीवर हल्ला; CCTV आले समोर

काय आहे नेमके प्रकरण?
कोल्हापूरमधील विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून तणाव निर्माण झाला आहे. भगवा गमजा घालून वर्गात बसलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढल्यानं हा वाद चिघळला. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आम्हाला बाहेर काढता, मग मुस्लिम मुली वर्गात हिजाब घालून का बसतात असा प्रश्न विचारत कॉलेजमध्ये आंदोलन केले. यामुळे काही काळ कॉलेजमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

कॉलेजमधून विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जय श्री राम अशा घोषणाही विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या. दरम्यान, अद्याप याबाबत कॉलेज प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!