Toll

Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी !

539 0

सातारा : साताऱ्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून चाकरमान्यांची कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी गर्दी वाढल्याने खंबाटकी घाटात वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे तर आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई, पुण्याहून गणपती उत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी जात आहेत. कालपासून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोल मोफत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने वाहतुकीत वाढ झालेली आहे. यामुळे आनेवाडी टोल नाका आणि खंबाटकी घाट या दोन्ही ठिकाणी गणेश भक्तांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Share This News
error: Content is protected !!