Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मा यांनी बावनकुळेंची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी

1147 0

बीड : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आजच्या भेटीदरम्यान करुणा शर्मा (Karuna Sharma) , रामदास आठवले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये दहा मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच करुणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एक मोठी मागणी केली.

अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

काय केली मागणी?
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या कारमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता परळीच्या लॉकअपमध्ये संशयित आरोपीचा मृत्यू झाला. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंचं तात्काळ निलंबन करावे अशी मागणी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यांकडून करण्यात आली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चाना मोठे उधाण आले आहे.

Share This News
error: Content is protected !!