Devendra Kumar Upadhye

Devendra Kumar Upadhye : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. देवेंद्र उपाध्याय यांची नियुक्ती

913 0

मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती. त्यावर केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी आज शिक्कामोर्तब करत तशी अधिसूचना जारी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे 30 मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. दरम्यान 6 जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायवृंदाने न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.

3 न्यायधीशांच्या बदलीची घोषणा
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी तीन न्यायाधीश दिनेश कुमार सिंग, मनोज बजाज आणि गौरांग कंथ यांच्या बदलीची घोषणा केली होती. भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करत या सर्व न्यायमूर्तींची बदली केली आहे.

Share This News
error: Content is protected !!