Yash Mahale

Yash Mahale : जळगाव हळहळलं ! देशाने भावी लेफ्टनंट कर्नल गमावला; यश महालेचा दुर्दैवी मृत्यू

3814 0

जळगाव : जळगावमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सैन्य प्रशिक्षण घेत असताना जखमी झालेल्या भावी लेफ्टनंट कर्नलचा (Yash Mahale) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या बातमीनंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. यश गोरख महाले असे मृत कॅप्टनचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील कॅप्टन यश गोरख महाले हा नुकताच भारतीय सैन्यात भरती झाला होता. भरतीनंतर पुणे येथील खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असताना बॉक्सिंग खेळत असताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर पुण्याच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यश गोरख महालेवर त्याच्या मूळ गावी म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी गावात त्यांच्या पर्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सैन्यदलात भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!