jalgav accident

ट्रॅक्टरचा टायर फुटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू; जळगावमधील घटना

1452 0

जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्पसमोर हा अपघात झाला आहे. पवन हिम्मत पाटील (वय – 20 चिंचखेडा खुर्द ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
पवन हिम्मत पाटील हा कृष्णापूरी येथील एका व्यक्तीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीचे काम केले जात होते. घटनेच्या दिवशी पहाटे पवन हा नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर घेवून पाचोरा शहरालगत असलेल्या गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूकीसाठी गेला होता. यादरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन भरधाव वेगाने पाचोरा शहराकडे येत असताना अचानक हॉटेल स्वप्नशिल्प समोर ट्रॅक्टरचा टायर फुटला आणि पवनचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि तो महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळला आणि पलटी झाला.यामध्ये पवन हिम्मत पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक नरेंद्र नरवाडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

पवन हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिम्मत पाटील हे पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रूक येथील अविनाश देशमुख यांच्याकडे मजुरीचे काम करतात. मृत पवन याच्या माघारी एक बहीण व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!