जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला झाला आहे. बापूसाहेब भिका थोरात (वय 49, रा. राजाराम नगर, कानळदा रोड, जळगाव) असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी ड्युटी आटोपून खोलीवर परतल्यावर अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जळगाव शहरातील कानळडा रोड परिसरातील राजाराम नगर येथील रहिवासी बापू साहेब थोरात हे वनविभागात 2010 पासून वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या मुक्ताईनगर येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचे कुटुंब जळगावात वास्तव्यास आहे. ड्युटी मुक्ताईनगर येथे असल्याने बापूसाहेब थोरात तेथेच खोली घेऊन राहत होते. सोमवारी बापूसाहेब हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले. ड्युटी आटोपल्यावर संध्याकाळी ते खोलीवर आले असता अचानक काही वेळानंतर त्यांना छातीत दुखायचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले.
यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी बापूसाहेब यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचा उपचारादरमायन मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. बापूसाहेब यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. बापूसाहेब थोरात यांच्या माघारी आई, वडील, पत्नी, 2 मुले, 3 भाऊ, काका असा मोठा परिवार आहे.