Mansoon

4 जून रोजी भारतात दाखल होणार मान्सून; हवामान खात्याचा अंदाज

607 0

पुणे : एल निनोच्या पार्श्वभुमीवर मान्सून तब्बल आठ दिवस उशीराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकुल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मंग‌ळवारी या मान्सूनने अंदमानच्या सागरात धडक दिली होती. त्यानंतर तीन दिवसांत त्याचा प्रवास बंगालच्या उपसागरात होण्याचा अंदाज होता. मात्र सगळे अंदाज फेल ठरवत मान्सूनने वेगाने प्रगती करण्यास सुरूवात केली. आणि त्यामुळे हा मान्सून आता बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची आणखी प्रगती अपेक्षित असून तो अरबी समुद्रातील काही भागात लवकरच दाखल होईल. यंदा मान्सून 4 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!