मुंबई : मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या कैद्यांच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता दिली आहे.
3 टप्प्यात 581 कैद्यांची तुरुंगातून होणार सुटका
पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी 206 कैद्यांची सुटका
दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189 कैद्यांची सुटका
तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 कैद्यांची सुटका
सुटणाऱ्या कैद्यांची वयोमर्यादा
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले पुरूष कैदी, ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7 कैदी आहेत.
तरुण गुन्हेगार 12 ते 21 वर्षे वयात गुन्हा केला, त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 10 कैदी आहेत. हे कैदी माफी वगळता आहेत.
निर्धन आणि दीन कैदी, ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले 2 कैदी
ज्यांनी एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी दोन तृतीयांश अथवा 66 टक्के कालावधी पूर्ण करणारे 167 कैदी आहेत.
विशेष माफी मंजूर असलेले कैदी
येरवडा जि. पुणे खुले जिल्हा कारागृह 1
येरवडा मध्यवर्ती कारागृह 16
नाशिक रोड जि. नाशिक मध्यवर्ती कारागृह 34
ठाणे मध्यवर्ती कारागृह 1
नागपूर मध्यवर्ती कारागृह 23
अमरावती खुले कारागृह 5
अमरावती मध्यवर्ती कारागृह 19
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 5
कोल्हापूर खुले 5, जालना 03
पैठण खुले 02
औरंगाबाद खुले 02
औरंगाबाद मध्यवर्ती 24
सिंधुदुर्ग जिल्हा 13
मुंबई मध्यवर्ती 07
तळोजा मध्यवर्ती 08
अकोला 06
भंडारा 01
चंद्रपूर 02
वर्धा जिल्हा 02
वर्धा खुले 01
वाशिम 01
मोर्शी जि. अमरावती खुले 01
गडचिरोली 04