Gadchiroli News

Gadchiroli News : नदीला पूल नसल्याने मृतदेह खाटेच्या साहाय्याने नेण्याची वेळ

569 0

गडचिरोली : आज महाराष्ट्राने बरीच प्रगती केली असली तरी काही ठिकाणी (Gadchiroli News) अजूनदेखील चित्त विदारक चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले आहेत तर कुठे पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी पूल नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. यामध्ये नदी ओलांडण्यासाठी पूल नसल्यामुळे नागरिकांना मृतदेह भरलेल्या नदीतून खांद्यावर न्यावा लागला. ही घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गडचिरोली जिह्यात पूल नसलेल्या नाल्याला पूर आल्यानं मृतदेह खाटेवर ठेवून भरलेल्या नाल्यातून गावी अंत्यसंस्कारासाठी न्यावं लागल्याचा प्रकार घडलाय. भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गुंडेनुर येथील 50 वर्षीय काटिया करिया पुंगाटी हे आजारी पडल्यानं त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना घरी नेण्यासाठी नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

रुग्णालयापासून गुंडेनुरनाल्या पर्यंत सदर शव ट्रॅक्टर ने नेण्यात आलं. गुंडेनूर नाल्यावर पुल नसल्यानं काही नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून
ती खाट आपल्या खांद्यावर घेऊन नाला पार केला. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नदी आलांडण्यासाठी पूल नाही. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून नदी पार केली.

Share This News
error: Content is protected !!