Rahul Uddhav eknath

आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

632 0

मुंबई : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधीमंडळात लवकरच खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली आहे.

यानंतर अपात्र आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटालाही तपासणीसाठी बोलण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. या आमदारांच्याअपात्रतेबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अपात्रतेच्या निर्णय़ाला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. जर सर्व नियमाचं पालन करुन निर्णय दिला नाही. तर हा आमदारांवर अन्याय असेल. त्याचाही विचार करणं आवश्यक आहे.

Share This News
error: Content is protected !!