Pune University

पुणे, मुंबई अन् कोकण कृषी विद्यापीठाला मिळाले नवीन कुलगुरु; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

813 0

मुंबई : अखेर आज मुंबई विद्यापीठ (Mumbai University), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University) आणि कोकण कृषी विद्यापीठासाठी (Konkan Agricultural University) कुलगुरुंची निवड करण्यात आली आहे. डॉ. रवींद्र कुलकर्णी (Dr. Ravindra Kulkarni) यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. संजय भावे (Dr. Sanjay Bhave) यांची कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी (Vice Chancellor) नियुक्ती केली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी तिन्ही कुलगुरुंच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

Share This News
error: Content is protected !!