Railway

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कन्फर्म तिकिटावर करू शकणार दुसरा प्रवास

2985 0

पुणे : रेल्वे (Railway) प्रवासासाठी काढलेले तिकीट हे अहस्तांतरणीय असते मात्र आता तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट (Confirm ticket) रक्ताच्या नात्यातील कुठल्याही अन्य प्रवाशाला ट्रान्सफर करू शकणार आहात. त्यासाठी रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी तुम्ही तुमच्या कन्फर्म तिकिटावर कुणी अन्य व्यक्ती प्रवास करताना आढळला तर त्याला गुन्हा मानला जात असे.

सोप्या भाषेत सांगायचं तर तिकीट बुक केल्यानंतर काही कारणानं तुम्हाला प्रवास करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला कन्फर्म तिकीट कॅन्सल (Cancel Ticket) करावे लागत होतं. आता मात्र तसं करावं लागणार नाही. कॅन्सल केल्यावर रेल्वे प्रवाशांना अनेकदा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असे. त्यामुळे इंडियन रेल्वेने आता आरक्षित तिकिटांवर प्रवाशांना खास प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्याअंतर्गत जे लोक कन्फर्म तिकिटावर प्रवास करू इच्छित नाही त्यांना तिकीट ट्रान्सफर (Ticket Transfer) करता येणार आहे. तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप्लिकेशन स्टेशन मास्टर यांना द्यावे लागेल. याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला तुमचे कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करू शकता. रेल्वेच्या या निर्णयानं रेल्वे प्रवाशांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.

Share This News
error: Content is protected !!