देशभरात फूड, कपडे, इतर साहित्यांची ऑनलाइन खरेदी करता येते. ऑनलाइन खरेदी केलेले हे सामान अगदी घरपोच डिलिव्हर केले जाते. स्वतः जाऊन तासंतास शॉपिंग करण्याकडे लोकांचा कल कमी झाला असून घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करण्यावर लोकांनी भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता थेट मद्य देखील ऑनलाइन मागवता येणार आहे.
कोण देणार सेवा ?
सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या अनेक ऑनलाइन संस्था आहेत. झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट आणि बिग बास्केट यांसारखे ॲप आणि वेबसाईट घरपोच जेवण डिलिव्हर करतात. याच ॲप्स कडून आता दारू देखील घरपोच डिलिव्हर केली जाणार आहे. देशातील काही राज्यांमध्ये दारूची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबवत आहेत. या प्रोजेक्टवर सध्या काम सुरू असून काहीच दिवसात ही सेवा सुरू होईल. त्यावेळी मात्र रांगेत उभे राहून दारू खरेदी करण्याची गरज भासणार नाही. मात्र ही सेवा सध्यातरी काही मोजक्याच राज्यांमध्ये सुरू होणार आहे.
या राज्यांमध्ये सुरू होणार सेवा
देशातील गोवा दिल्ली हरियाणा पंजाब कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये ऑनलाइन दारू डिलिव्हर केली जाणार आहे. यासाठी झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट आणि बिग बास्केट या प्लॅटफॉर्म द्वारे ही सेवा दिली जाणार आहे. मात्र ही सेवा प्रत्यक्षात चालू व्हायला आणखी काही महिने लागू शकतात, अशी माहिती मिळाली आहे.