पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठी घडामोड;UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा

280 0

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग ही चांगलं चर्चेत आलंय. पूजा खेडकर ने केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस अपंगत्व आणि ओबीसी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच तिने नाव आणि इतर माहिती बदलून अनेक वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचेही उघडकीस आलंय. पूजा खेडकर फसवणुकीचा प्रकरण समोर आल्यानंतर यूपीएससीच्या विश्वासार्हतेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.ओबीसी आणि आर्थिक मागस प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी यूपीएससी परीक्षेत लाभ मिळविल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटे अंपगत्वाचे प्रमाणपत्र देऊन यूपीएससीची दिशाभूल केली असल्याचे सांगितले गेल. त्यामुळे यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि त्यातच मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.59 वर्षीय मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मानले जातात. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधात त्यांचा अभ्यास आहे. बडोद्यातील महाराजा सयाजीराजे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून २००५ ते २००८ या काळात काम पाहिले होते.गुजरातमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे 2009 ते 2015 या काळात कुलगुरूपद भूषविले होते.त्याचबरोबर सोनी यांनी सरदार पटेल विद्यापीठात त्यांनी 1991 ते 2016 या काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अध्यापन केले.मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. तसेच प्रशासकीय व्यवस्थेमधील आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अशा उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केले जाते. परंतु सोनी यांचा कार्यकाळ 2029 ला संपणार होता. त्या आधीच सोनी यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जातंय.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!