महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचं निधन

501 0

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल  के. शंकरनारायण यांचं रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळ  येथील पालघाटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२०१० ते २०१४ या काळात के. शंकरनारायण महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

के. शंकरनारायण हे कॉंग्रेसचे  जेष्ठ नेते होते. केरळ विधानसभेचे ते ४ वेळा सदस्य होते. केरळ सरकारमध्ये ते अर्थ, कृषी, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांचे मंत्री होते. महाराष्ट्राशिवाय नागालँड, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गोवा या राज्यांचेही ते राज्यपाल होते. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Share This News
error: Content is protected !!